जळकोट,दि.२३: मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवजन्मोत्सव समितीचे आधारस्तंभ कै. किशोर कदम यांच्या स्मरणार्थ राजे शिवछत्रपती शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर या शाळेस विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत बसण्यासाठी ५ सिमेंटचे बाक भेट देण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट संभाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मैदान असूनही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुविधा नव्हत्या. ही गरज ओळखून राजे शिवछत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने किशोर कदम यांच्या स्मरणार्थ ५ सिमेंट बाक भेट देण्यात आले. या बाकाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव सोनटक्के यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक विजयकुमार मोरे, बालाजी पाठक, दाजी चव्हाण, पंडित पाटील, शिवजन्मोत्सव समितीचे ॲड. सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, तानाजी गंगणे, बसवराज मडोळे, पवन जाधव, गुड, मंगेश सुरवसे, दिनेश कलाल, शाळेचे मुख्याध्यापक धनराज रेणुके, शाळेचे सहशिक्षक डी. एन. सोनवणे, एन.एन.इटकरी,एस.जी. अभीवंत, जी.के.मुरमुरे,डी. एस.वणवे, श्रीमती एम.एस.रेणुके,एम.बी. महामुनी, एम.एस. भोसले आदीजण उपस्थित होते.