वागदरी , दि २३
तुळजापूर तहसीलचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना 15 ऑगस्ट स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानित केले.
त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार तांदळे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे , जीवन कदम, रामदास गोरे, आण्णा बंडगर , अविनाश शिरगिरे , विनोद मोठे, दत्ता कदम, अमोल मोटे, गणेश गामाजी, सुरेश चौधरी, सुरेश मस्के , कमलेश कदम, रवि साखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.