भाजयुमोच्या उस्मानाबाद जिल्हा सचिवपदी नळदुर्ग येथील श्रमिक पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली असुन पोतदार यांच्या नियुक्तीमुळे नळदुर्ग शहर व परीसरात भाजपाला मोठी ताकद मिळणार आहे. पोतदार यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे.
श्रमिक पोतदार गेल्या बारा वर्षांपासुन भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन काम करीत आहेत. सुरुवातीला त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन राजकीय कार्यास सुरुवात केली सध्या ते नळदुर्ग शहर भाजयुमोचे अध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. नळदुर्ग शहर तसेच परीसरात भाजपाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. सामाजिक कार्यातही श्रमिक पोतदार यांचे कार्य अफाट आहे.
नळदुर्ग शहरात आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी आपली सहकाऱ्यांसह नळदुर्ग शहर व परीसरात मोठ्याप्रमाणात सामाजिक कार्य केले आहे. कोरोना महामारीच्या काळातही एक कोरोना योध्दा म्हणुन श्रमिक पोतदार यांनी केलेले कार्य कौतुकास्पद होते. त्याचबरोबर नळदुर्ग शहराची गरज लक्षात घेऊन जे भल्या, भल्या राजकारण्यांना जमले नाही. ते शहराला वैकुंठरथ उपलब्ध करून देण्याचे काम श्रमिक पोतदार आणि त्यांच्या टीमने केले आहे. श्रमिक पोतदार यांच्या या कार्याचा फायदा येणाऱ्या काळात भाजपाला होणार आहे. श्रमिक पोतदार यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या शिफारशीनुसार पोतदार यांची भाजयुमोच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता श्रमिक पोतदार यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. पोतदार यांच्या या निवडीबद्दल भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुशांत भुमकर,शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके, विशाल डुकरे, सागरसिंग हजारे, आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, धीमाजी घुगे, आयुब शेख, अभिजित लाटे, संजय वेदपाठक, पत्रकार विलास येडगे , शिवाजी नाईक , सुहास येडगे, यांच्यासह भाजपा व भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.