तामलवाडी , दि . २४ 

तुळजापूर  येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य किरण इंगळे यांची रायगड येथे  बदली झाल्याने त्यांचे जागी यवतमाळहुन गंगाराम सिंग यांची नियुक्ती झाली. मंगळवारी  ते रुजू झाल्यामुळे शिक्षक पालक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पालक-शिक्षक समितीचे सचिव प्रभाकर जाधव यांच्या वतीने नूतन प्राचार्य यांचा मानाचा फेटा बांधून शाल, श्रीफळ ,बुके देऊन सत्कार करण्यात आला. 
 उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य शिवकुमार स्वामी, सूर्यकांत गायकवाड ,पुरुषोत्तम जोशी, इराप्पा अमंगी,श्याम शुक्ला ,सुरेश भोरगे, रवींद्र अलशेट,धनाजी देशमुख, चक्रपाणि गोमारे,पद्माकर घोरपडे, नामदेव माने ,प्रकाश गुजर ,मधुकर कुलकर्णी,  राजकुमार शुक्ला ,गणेश आचार्य , श्रीमती सुजाता कराड, सुनिता वाघमारे, विद्या जाधव,  यांची उपस्थिती होती.   
                         
या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भोरगे यांनी  तर आभार  प्रभाकर जाधव यांनी केले
 
Top