उस्मानाबाद ,दि .२४:
लोकमंगल मल्टीस्टेट आनंद नगर उस्मानाबाद शाखेच्यावतीने इयत्ता दहावीमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक पंडित लोमटे, हिंदू परिषदचे सदस्य दत्तात्रय चौगुले ,निवृत्त शिक्षक सुधाकर तिर्थकर , राहूल कोरे यांच्या हस्ते शिक्षक हुलसुलकर सचिन यांचा व विद्यार्थी हुलसुलकर आर्या सचिन, भोसले श्रेयस सुभाष, शेख रोशनी, वसीम हमीद शेख, ऋतिक बाळासाहेब माने, सय्यद अंजुम आफिया, आरिफ शेख जिशान यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शाखाधिकारी जमदाडे ज्ञानेश्वर, शाखाधिकारी दीपक पाटील, विकास कदम,आशिष देशमुख, काका माने, शेख साहिल आदी उपस्थित होते.