वागदरी , दि . ८ :
सलगरा (मड्डी) ता.तुळजापूर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा सलगरा (मड्डी) गावचे माजी सरपंच मच्छिंद्र मसाजी वाघमारे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी ,सूना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधना बद्दल रिपाइं (आठवले) सह विविध पक्ष व संघटनेच्या वतीने त्याना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.