तुळजापूर खुर्द येथील प्राथमिक शाळेच्या गुणवत्ता व कार्यक्षमता जबरदस्त - सुरेश धस
तुळजापूर दि .१८
तुळजापुर नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ३ इमारत बांधकामासाठी आमदार सुरेश धस यांना वीस लक्ष रुपये निधीची घोषणा केली. नगर परिषद शाळेच्या गुणवत्ता आणि विविध उपक्रमांच्या सादरीकरणानंतर आमदार सुरेश धस प्रभावित झाले आणि त्यांनी सदर व निधीची घोषणा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्याकडून नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर (खुर्द) शाळेला तातडीने २० लाख रुपये देण्याचे आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस पाटील यांनी तुळजापूरात दिले.
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर खुर्द शाळेला भेट देऊन शाळेतील संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा ,सेंद्रिय खत, गांडूळ खत परसबाग या उपक्रमांना भेटी देऊन इंटरॅक्टिव बोर्ड वरती ऑनलाईन शिक्षण याची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली. शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला मराठवाड्यातील गुणवत्तेत सर्वप्रथम असणाऱ्या शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेचा लौकिक आहे. नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा गुणवत्ते अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना तुळजापूर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 या शाळेला भेट दिल्यानंतर समाधान वाटते आहे. बीड जिल्ह्यामध्ये अशा धर्तीवर नगर पालिकेच्या शाळा आपण निर्माण करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, शिक्षक या विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. शाळेची गुणवत्ता चांगली असून २००८ व २००९ या वर्षात औरंगाबाद विभागातील गुणवत्तेत उत्कृष्ट शाळा, २०१५ मराठवाड्यातील पहिली आय एस ओ शाळा अशी मराठवाड्यात नगरपालिकेची शाळा प्रथमच पाहिली असे गौरवोद्गार आमदार धस यांनी काढले. विद्यार्यांच्या वाढत्या संख्येमुळे शाळेची इमारत कमी पडत असल्या कारणाने शाळेची इमारत बांधकामासाठी तातडीने २० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी ,मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड , विनोद गंगणे , भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे , नगरसेवक पंडितराव जगदाळे, मंजुषा देशमाने, विजय कंदले, चद्रकांत कणे, अमर मगर, सचिन पाटील , किशोर साठे, सुनील रोचकरी, नागेश नाईक, विशाल रोचकरी, अविनाश गंगणे, सुहास साळुंके, गुलचंद व्यवहारे ,नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक , वैभव पाठक उपस्थित होते.
तुळजापूर (खुर्द) शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, सहशिक्षक आशोक शेंडगे , बालाजी साळुंके , विश्वजीत निडवंचे ,सहशिक्षिका श्रीम.निता गायकवाड श्रीम.निर्मला कुलकर्णी श्रीम. यास्मिन सय्यद या सर्व शिक्षकांचे कामाबद्दल आमदार धस यांनी कौतुक केले