तुळजापूर , दि १८ :
आमदार सुरेश धस यांच्याकडे नगरसेवक सुनिल रोचकरी यांचे मागणीवरुन श्री तुळजाभवानी मंदिरा शेजारील शुक्रवार पेठकडे जाणा-या दगडी पाय-या काढून तेथे रस्ता करण्यासाठी १० लाख रुपये निधीची मागणी केली,
यावेळी कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी १०लाख निधी देण्याचे मान्य केले असून याविषयी तातडीने पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन आमदार सुरेश धस यांनी दिले.
सदर कामासाठी दिलेल्या निधी बाबत नगरसेवक सुनिल संभाजीराव रोचकरी यांनी आमदार धस यांचे आभार व्यक्त केले.