खुदावाडी , दि .१९
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथिल राहणारे, अणदुर जि. प . केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक बाबुराव किसनराव जवळगे , वय ५६ वर्षे , यांचे उपचारादरम्यान गुरुवार रोजी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील , पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते मनमिळावू विद्यार्थी प्रिय व सुस्वभावाचे होते . अंत्यविधी आज दुपारी १ वाजता खुदावाडी येथे करण्यात येणार आहे.