महामार्गावरील दस्तापूर ता . लोहारा येथिल लोखंडी पुल

नळदुर्ग , दि .१९ : 
विद्यार्थ्यांसह  नागरिकांना शहारामधुन गेलेला महामार्ग ओलांडून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतअसुन गौरसोय व आपघात टाळ्ण्याकरिता प्रशासनाने   नळदुर्ग येथे महामार्गावर पुल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  संबंधित विभागास  निवेदनाद्वारे केली आहे.


 शहरातील बसस्थानक ते मुख्य मार्गावर व तसेच बालाघाट कॉलेज ते व्यंकटेश नगरच्या बाजूस ये - जा करण्यासाठी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला यांच्या सोयीसाठी लोखंडी पुल करणे गरजेचे आहे. 

नळदुर्ग शहरातील बसस्थानक ,भवानी नगर,रहीम नगर, कलाशंकर नगर,डी.एड.कॉलेज, विविध शाळा यांच्या सोयीसाठी व तसेच बालाघाट कॉलेज ते समोरिल बाजू (व्यंकटेश नगर) शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी व  नागरिकांना व तसेच तेथे बस स्टॉप आहे, म्हणुन प्रवासी यांना ये - जा करण्यासाठी या महामार्गावर लोखंडी पुल बसविणे अत्यंत आवश्यक असून,या महामार्गावर  दिवसराञ प्रचंड रहदारी  आहे.

मोठयाप्रमाणावर वाहने ये-जा करतात . नागरिकाना  विविध भागात व मुख्य बाजारात ये-जा करण्यासाठी सद्य परिस्थितित जीव मुठित घेऊन जावे लागत आहे. महामार्ग मोठा झाल्याने वाहनाचा वेग सुद्धा वाढला आहे,अशात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणुन मा.साहेबांनी सदर विषयाची दखल घेत येथे लोखंडी पुल बसविण्यासाठी तात्काळ पावले उचलावित,अशी मागणी करण्यात आली आहे. 

 
Top