नळदुर्ग , दि . १९ : 

तुळजापूर  तालुक्यातील  नंदगाव येथे सुमारे २ कोटी ५६ लक्ष  रुपये निधीचे विविध विकास कामाचे जि .प.मा. उपाध्यक्षा सौ.अर्चना राणाजगजितसिह    पाटील यांच्या  हस्ते भुमीपुजन व लोकार्पण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद  जि.प. अध्यक्षा  सौ.अस्मिता कांबळे  तर तुळजापूर प.सं.सभापती सौ.रेणुका इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडले. 


यावेळी अर्चना पाटील यांनी तांडा वस्तीसाठी १२ लक्ष, दलित वस्ती ५४ लक्ष बोरगाव ते नंदगाव २० लक्ष जिल्हा परिषद प्रशाला संरक्षण भिंत २० लक्ष नंदगाव दहिटणा शेत रस्ता २५ लक्ष, नंदगाव ते काझीकणबस सरहद्द शेत रस्ता २६ लक्ष, नंदगाव ते सिंदगाव शेतरस्ता मजबुतीकरण २३ लक्ष ,व २५/१५ अतंर्गत २७ लक्ष, जिल्हा परिषद अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन १६ लक्ष, ग्रा.पं.१५ वा वित्तआयोगा अंतर्गत ३१लक्ष, अरबळे गल्ली सिमेंट रस्ता ३ लक्ष, असे विविध कामाचे भूमिपूजन  पार पडले. यावेळी मान्यवराच्या हस्ते गावातील सर्व कोरोना योध्दा,  आशा सेविका , माजी सरपंच,  उपसरपंच यांचे विशेष सत्कार करण्यात आले, गावातील इतर कामेही सुचवले असुन सुधारीत प्राथमिक उपकेंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना, मठाचे सभामंडपाचे काम बिरुदेव सभामंडप, मुस्लिम स्मशानभूमीचे  वॉल कंपाऊंड , ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्र, नंदगाव ते सलगरा (मड्डी) रस्त्याचे नंबर मिळाले असून त्याचे काम लवकर चालू करावे,  प्रमुख जिल्हा मार्ग नळदुर्ग ते बोळेगाव रस्त्याच्या कामासह  अनेक मागणीही   सिध्देश्वर  कोरे सरपंच सौ.सरस्वती  कलशेट्टी , उपसरपंच.सौ.कावेरी काटे , ग्रा.पं.सदस्यानी   वरिल सर्व कामे सुचविली. 


यावेळी सिंदगावचे सरपंच  विवेकानंद मिलगीरे , बोरगावचे सरपंच सौ.अर्चना मोहन माने, सलगरचे सरपंच व विस्ताराधिकारी ग्राम विकास अधिकारी' अशा सेविका , बचत गटाच्या कार्यकर्त्यां,  भाजपाचे  कार्यकर्ते ,  ग्रामपंचायतचे आजी , माजी सदस्य गावांतील प्रतिष्ठित नागरिक  व शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top