उस्मानाबाद , दि .१९ :
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य तथा विमुक्त भटक्या जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिले आहे.
गोर सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध मागण्यासाठी दि.१७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ पर्यंत साखळी उपोषण चालू आहे. यावेळी चव्हाण हे बोलत होते. या मागण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण ठेवावे, वसंतराव नाईक तांडा वस्ती योजनेवर बंजारा समाजातील व्यकतीची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे,नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, यासह विविध मागण्यासाठी उपोषण चालू आहे, या उपोषणास विमुक्त भटक्या जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे लक्ष्मण चव्हाण, बंजारा सेवा संघाचे हरीष जाधव, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, शिव सेनेचे गुलाब जाधव, सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक राज राठोड ,समता परिषदेचे सरचिटणीस आबासाहेब खोत, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष सतीश कदम,डी .एम. कोळी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिंदे,बामसेफचे मारुती पवार, तुळजाभवानी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पवार, या सर्व संघटनेने गोर सेनेच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी गोर सेनेचे प्रदेश संघटक राजाभाऊ पवार, जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष लखन चव्हाण, लालसिंग चव्हाण, संघटक दिलीप आडे, सहसचिव कुमार राठोड, तुळजापूर तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, उमरगा अध्यक्ष शकंर राठोड, उस्मानाबाद अध्यक्ष कालिदास चव्हाण, लोहारा अध्यक्ष पिंटू चव्हाण, बालाजी राठोड, राजुदास राठोड, मोहन राठोड, मिरा राठोड आदि उपस्थित होते.