जळकोट, दि. २० : तुळजापूर तालुक्यातील रामतिर्थ  देवस्थान परिसरात दि. १९ रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कल्याण करपे, उपाध्यक्ष महेबूब शेख, कोर कमेटी सदस्य अशोक मायाचारी,संजय कुंभार,  माजी तालुका अध्यक्ष निजाम शेख, शिवानंद नाटेकरी,अलीम शेख, प्रकाश बडगे,शिवानंद हात्ते,मारूती बनसोडे,बाबू राठोड यांच्यासह आदि फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

 
Top