अक्कलकोट, दि. ३१
अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी रोहिणी पवार, यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर, सचिव पदी रुपाली इंगळे यांची वर्णी लागली आहे.
तालुक्यातील महिला पोलीस पाटील संघटनेची संपूर्ण कार्यकारणी तालुकाअध्यक्ष रहिमान अत्तार, उपाध्यक्ष महादेव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धार्थ कोळी, सचिव धनय्या स्वामी,यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. पुढील प्रमाणे नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष भैरम्मा माळी (दक्षिण), वैशाली मोरे(उत्तर), कोषाध्यक्ष पूनम गायकवाड, सहसचिव मिनाक्षी माळी, प्रसिद्धीप्रमुख शुभांगी बाबर, कार्याध्यक्ष लालबी हंनुरे, संघटक सुमित्रा सुरवसे, सहसंघटक अर्चना पवार, खजिनदार महानंदा माळी, अशी निवड तालुकास्तरावर केली असून, तालुक्यातून जिल्हा कार्यकारणी निवड म्हणून सुप्रिया गायकवाड, महादेवी पाटील, साक्षी कोळी, यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
तालुक्यातील विविध बीट प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी खलील प्रमाणे
करजगी बीट श्रीदेवी कोळी, दक्षिण विभाग महादेवी अरवत, हंनुर बीट शैलजा पाटील, नागणसुर बीट ज्योती हंगरगी, उत्तर विभाग सरस्वती पाटील, मैदंर्गी बीट मीनाक्षी चौधरी, वागदरी बीट शांताबाई भंगरगी, दुधणी बीट रेश्मा पठाण, दक्षिण उपप्रमुख शिवमंगल मुगलीमठ, उत्तर उपप्रमुख जगदेवी तांबुळे, अशी वरील सर्व पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख सिध्दार्थ कोळी, पोलीस पाटील धनय्या स्वामी, रोहन शिर्के, मोहोन वाघमोडे, महेश कोतले ,संतोष गुजा, योगेश जाधव,दयांनद पुजारी,सुरेश मैदर्गी,संतोष बनसोडे, दिगंबर सोनकांबळे,रमेश राठोड, भिमराव पाटील,विजय बावकर, लक्ष्मीपुत्र अंदेवाडी,श्रीशैल पाटील, अंबण्णा अस्वले,भिमाशंकर म्हेत्रे, आदि पोलीस पाटील यांच्या उपस्थिती होती.