अणदूर, दि.३१ : 

राष्ट्र पुरुषांच्या आठवणी त्यांचे जीवनचरित्र या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजतील, यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड होईल.कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने केलेले हे समाजोपयोगी कार्य असल्याचे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते.
 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे गुरुजी होते तर माजी सभापती दीपक आलुरे,सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी दिनकर घुगे,भिवाजी इंगोले,साहेबराव घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नरे गुरुजी यांनी कै. जीवनराव घुगे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला,सन्मित्र पत संस्थेच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक गरज भागवली, गावातील व समाजातील तंटे मिटवले असल्याचे सांगितले.

यावेळी अणदूर येथिल जिल्हा परिषदेच्या सहा शाळांना प्रत्येक ५० राष्ट्र पुरुषांच्या जीवन चरित्राची पुस्तके भेट देण्यात आली.  डॉ संतोष पवार यांना कै. जीवनराव घुगे गुरुजी यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. आर एस गायकवाड,डॉ संतोष पवार यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव घुगे यांनी सूत्रसंचालन अनिल घुगे तर आभार कमलाकर घुगे यांनी मानले.

यावेळी काशीनाथ शेटे दीपक घोडके, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, उध्दव घुगे , रेवण शेटे, वालचंद कंदले,वसंत घोडके, बालाजी कुलकर्णी,  डॉ.व्यंकटेश घुगे, दयानंद मुडके,यशवंत मोकाशे, अनिल अणदुरकर ,काशिनाथ घुगे,बापु घुगे,अनिल अणदूरकर,शाहुराज मोकाशे, म्हाळाप्पा गळाकाटे, शिवकुमार स्वामी,प्रज्योत करपे, सोमनाथ लंगडे,नागनाथ घोडके,सहा शाळांचे मुख्याध्यापक,गावातील जेष्ठ नागरिक,विद्यार्थी, शिक्षक व घुगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
 
Top