तुळजापूर , दि .२६:
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवु लागताच तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांचे आगमन मोठ्या संखेने होवु लागल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरची अर्थव्यवस्था पुनश्च रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे शहरवासियामध्ये श्रावण महिन्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोशीतील पंचवीस ते तीस गावचे अर्थकरण श्री तुळजाभवानी मंदीरवर अवलंबून आहे. या गावातील हजारो तरुणांना येथे रोजगार मिळतो, तसेच शेकडो वृद्ध अंध,अपंग निराधाराचे पोट येथे भरते. शेकडो व्यापारी वर्गाचा व्यवसाय येथे चालतो. स्थानिक नव्वद टक्के कुटुंबाचा उदारनिर्वाहचा प्रश्न येथे सुटतो. गरीबां पासुन श्रीमंता पर्यतचे सर्वाचेच अर्थिक व्यवहार चक्र मंदीरवर अवलंबून आहे.
माञ कोरोनामुळे श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना प्रवेश बंद होवुन या लोकांचा रोजी रोटीवरच गडांतर आल्याचे सर्वश्रुत आहे.
कोरोना पहिल्या टप्पानंतर 16/11/2020 ला उघडले होते,व पुनश्च कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दुसऱ्या टप्यातील 5/4/21 ला मंदीर भाविकांना बंद केले .
याचा मोठा परिणाम तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह पंचवीस गावांवार झाले. दुसरा फटका माञ सर्वानाच प्रचंड ञासदायक ठरला . यात पहिल्या टप्यातील नुकसानमुळे आधीच मेटाकुठीला आलेले सर्वच घटक दुसरा टप्पाचा आघात त्यांना सहन करण्यापलिकडे ठरला. पण करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर पडला. माञ देवीकृपेने कोरोना दुसरा टप्पा ओसरु लागला असुन त्यात श्रावण मास सुरु होताच देवीचे बाहेरून का दर्शन घडेना, या हेतुन श्रावणातील खेटा पुर्ण करण्यासाठी सध्या भाविकांचे आगमन तिर्थक्षेञी मोठ्या संखेने होवु लागल्यामुळे शहरातील अर्थव्यवस्थेचे थांबलेले चक्र हळुहळु चालु झाल्याचे दिसत आहे. याचे समाधान येथील व्यापारी ,पुजारी , बेरोजगार तरुणासह अवलंबून आसणा-यांना होवु लागले आहे.
राज्य व देशातील करोना कमी होत असल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकांना कोरोना बरोबर चालायाचे त्या शिवाय पर्याय नाही, हे उमगल्याने आता येथे येणारे भाविक दक्षता घेवुन येत आहे.
त्यामुळे भाविकांची उत्सुकता ताणुन देण्यासाठी प्रथमता दोन डोस घेलेल्याना मंदीरात प्रवेश देण्याची मागणी होत आहे व मंदीर अखंड बावीस ते तेवीस तास सुरु ठेवले तर भाविकांचा गर्दीवर नियंत्रण येवुन जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळेल अशी मागणी सर्वच स्तरातुन होत आहे.
माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांची मंदीर सुरु करण्यासाठी महसुल मंञ्यांना विनंती
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले करावे यासाठी माजीं मञी मधुकरराव चव्हाण यांनी महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आसुन याचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहीती माजी मंञी चव्हाण यांनी दिली.
कोरोना नियमाचे भाविकाकडुन पालन !
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणारा देवी भक्त मास्कचा वापर करुन देवीदर्शन करीत असल्याने व लगेचच गावी जात असल्याने भाविक वर्ग ही शासनाच्या कोरोना निर्देशाचे पालन करीत असल्याबदल दिलासादायक ठरत आहे.