लोहारा , दि .२६ :
लोहारा तालुक्यातील सास्तुरच्या गोदावरी अर्बन सोसायटी शाखेच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सस्तुरसह पाच राज्यातील सर्व शाखांमधून जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी पाऊण टक्का (०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी गोदावरी अर्बनने जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.
यावेळी गोदावरी अर्बन सोसायटीचे स्थानिक संचालक रब्बानी नळेगावे, विजयकुमार क्षिरसागर, श्याम हासुरे, उद्धव पवार, शिवशंकर मिटकरी, संतोष मूर्टे, गोविंद कोळी, किसन पवार व कर्मचारी वृंद उपस्थित होते.