चिवरी ,दि .३०: 

 वंशाला दिवा हवा म्हणून मुलाच्या जन्माचा अट्टाहास केला जातो, तर अनेकदा मुलीच्या जन्मावर अश्रू ढाळले जातात. कायद्याने स्ञी  पुरुष समानता असली तरी मुलीच्या जन्माच्यावेळी बहुतेकदा दुःखच केली जाते, असे असताना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शंकर प्रकाश झिंगरे या युवकाने आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले आहे. 

येथील झिंगरे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील अपंग निवासी शाळेस एक गोणी गहू आणि एक गोणी तांदूळ असा एक महिना पुरेल एवढे धान्याचे वाटप करून आपल्या कन्यारत्नाचे  स्वागत केले आहे, झिंगरे परिवाराकडून केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे  सर्वत्र कौतुक होत आहे. 

 
Top