परंडा, दि .३० :
गेली अनेक वर्षे शेतकरी स्वतः दिवस रात्र करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो, कुठेलेही उत्पन्न घेतले तर त्याला त्याचा खर्च सुद्धा निघत नाही.कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी चक्री वादळ, कधी जंगली जनावरे, आणि नंतर सरकारी धोरण, वीमा कंपनीचा मनमानी, बॅंकेचे दुर्लक्ष, सततचा कोरोना महामारीचा उत्पादीत केलेल्या शेत मालावर होणारा परिणाम हे सर्व पाहिल्यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी का इतके कठोर काळजाचे बनलेत हा प्रश्न उपस्थित होतो, कधी नव्हे तो या वर्षी सोयाबीनला थोडा समाधान कारक भाव भेटत होता, पण 12 लाख टन सोया केक आयात करण्याचे ठरल्यानंतर प्रचंड प्रमाणात भाव घसरले आहेत.
त्यामुळे सरकारने सोया केक आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असे निवेदन दिले असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, शंकर घोगरे धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णू काळे, शहाजी सोमवंशी, गुरूदास भोजणे, नेताजी जमदाडे, राजेंद्र हाके, अमर हजगुडे, मेघराज दंडनाईक ईत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत .