तुळजापूर दि. ३० : 

महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपच्या अन्य कार्यकर्त्यांनी एक तास शंखनाद आंदोलन केले. नगराध्यक्ष सचीन रोचकरी व अन्य भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांना खुले करण्याच्या मागणीसाठी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला तुळजापुरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आंदोलनामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेगड्या  हिंदुत्वावर टीका केली, दारूची दुकाने आणि इतर गर्दीची ठिकाणे सुरू केले आहेत मग मंदिरे खुले करण्यासाठी सरकारला कोणती अडचण आहे हे सरकार हिंदू विरोधी आहे का असा प्रश्न त्यांनी याप्रसंगी आंदोलनात विचारला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शंखनाद करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या.
 
Top