उस्मानाबाद , दि . ७
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी शुक्रवार दि.६ आँगस्ट रोजी मराठवाड्यातील मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्वाची बैठक घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना , त्यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका मनसे लढविणार असून, त्याबाबतचे सर्व पदाधिका-याचे एकदिवसीय शिबिर घेण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेशी मैत्री वाढवा , जनतेने एक चांगला मित्र म्हणून आमच्याकडे बघितले पाहिजे, तरच पक्ष मोठा होईल, स्वतःची ओळख निर्माण करा.पक्ष वाढायला वेळ लागणार नाही. मराठवाड्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत या सर्व निवडणुका मनसे लढविणार असून सर्वांनी त्यादृष्टीने कामाला लागावे.
या बैठकीत सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती केली. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील फुलवाडी व तलमोड येथील टोलनाक्यांवरील वाहनधारकांची आर्थिक लूट, महामार्गावरील निकृष्ठ कामे, पिक विमा,आदी शेतकर्यांच्या व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.