चिवरी: दि . ७ : 


बालाघाटच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवीची आकाडबोने यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता उपाय म्हणून ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या पुढाकारातून रद्द करून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडून साजरी करण्यात आली.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्यामुळे  चिवरी येथील महालक्ष्मीचे मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली  आकाडबोन यात्रा रद्द करण्याची सलग दुसऱ्या वर्ष असून,  यात्रा रद्द झाल्याने भाविकांतुन  व व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे, सोलापूर हैदराबाद महामार्गावरील अंदुर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचे मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश तेलंगणा , कर्नाटक, आधी राज्यातील लाखो भाविक, देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात, येथे वर्षभर मंगळवार ,शुक्रवार अमावस्या, पौर्णिमा,भाविक गर्दी करतात दरवर्षी देवींजीची माघ महिन्यातील पोर्णिमेपासुन येणाऱ्या पहिल्या मंगळवारी आणि आषाढ महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी मोठी यात्रा भरते यंदा मात्र दि ६ रोजी श्री महालक्ष्मी देवीचे आकाडबोन  यात्रेमधील सर्व धार्मिक विधी रूढी व परंपरा या स्थानिक पातळीवर मोजक्याच मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडून साधेपणाने साजरी करण्यात आली. 


यासाठी यात्रा काळामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर परिसर, नळदुर्ग  तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी, लक्ष्मी नगर आधी परिसरामध्ये नळदुर्ग  पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यासाठी सरपंच अशोक  घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस  पाटील रुपेश बिराजदार, तलाठी डी एन गायकवाड ,ग्रामपंचायत कर्मचारी आदीसह महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.
 
Top