तुळजापूर दि १६ :

तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे  यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट तहसिलदार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .

जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने  तहसीलदार सौदागर तांदळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समाधान कदम तसेच तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव महाराष्ट्र राज्य सचिव प्रफुल्लकुमार शेटे,  पुरवठा अधिकारी संदीप जाधव,  ग्राहक मंच प्रांत अध्यक्ष संपत जळके,  नितीन कदम,  माने छोटा अमृतराव इत्यादी  उपस्थित होते.

कोरोना काळात तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलेल्या कामाची नोंद तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी केलेले प्रयत्न याची नोंद घेऊन महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे.
 
Top