नळदुर्ग , दि . १५ :
येथील उपजिल्हा रुग्णालय तात्काळ सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी रुग्णालयाच्या रेंगाळलेल्या इमारती समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात आले,
यावेळी मनसेने आक्रमक पवित्रा घेत शासन व प्रशासनावर सडकून टीका केली, उपोषण स्थळी नायब तहसीलदार शिंदे व पत्रकारासमोर नवगिरे हे प्रचंड आक्रमकपणे सुस्त प्रशासनावर व पालकमंत्री यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप करीत संताप व्यक्त करीत पालकमंत्री नसून ते उद्घाटन मंत्री आहेत असेही टिका केली ,रुग्णालय सुरू करण्यासाठी अंदाजे साडे अकरा कोटी रुपये लागणार आहेत, पालकमंत्री यांनी यासाठी तात्काळ पाठपुरावा करून प्रशासनाला आदेशीत करावे,आणि या रुग्णालयात आरोग्य सुविधा सुरू करून नळदुर्ग शहरासह परिसरातील ६० ते ७० गावातील जवळपास दीड लाख लोकांना उत्तम अशा आरोग्य सुविधा सुरू करावी अशी मागणी करत मनसेचे पदाधिकारी स्वातंत्र्यदिनीच उपोषणाला बसले. यापूर्वी घंटानाद आंदोलन, पोस्टर वाँर, प्रतिकात्मक उद्घाटन करून, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता, परंतु अद्याप पर्यत हे रुग्णालय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या नाहीत,म्हणून मनसेच्या संतप्त पदाधिका-यांनी आज दि .१५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान दुपारी ३ वाजता जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुल्ला यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात हे रूग्णालय सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, जनहित कक्ष,विधी विभागाचे ॲड.मतीन बाडेवाले, तालुका सरचिटणीस गणेश पाटील, उपतालुकाध्यक्ष आकाश पवार, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवी राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, तुळजापूर मनविसे शहराध्यक्ष ऋषी माने,शहर सचिव आवेज इनामदार, सूरज अंगुले, अजित कांबळे, संदीप वैद्य, निखिल येडगे, मारुती पांचाळ आदी उपस्थित होते.
उपोषणस्थळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण , काँग्रेस पक्षाचे तथा नळदुर्ग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शब्बीर सय्यद सावकार , भाजप व्यापारी आघाडीचे धिमाजी घुगे, पञकार सुहास येडगे, भैरवनाथ कानडे , विलास येडगे , प्रा. पांडूरंग पोळे , दादासाहेब बनसोडे , आय्युब शेख, शोएब काझी , शिवाजी नाईक , सामाजिक कार्यकर्ते आशोक आलकुंटे , तलाठी टि. डी. कदम , आदीसह प्रतिष्ठित नागरिक , मान्यवरानी भेट दिली.