उस्मानाबाद , दि .०२: राजगुरू साखरे
शिवविधा प्रबोधिनी ट्रस्टच्या बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस अकॅडमी औरंगाबाद तर्फे एक वर्षे १००० विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांनी २१ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेसाठी डाॅ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथील तीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश नोंदविला होता. त्यापैकी श्रीकृष्ण देविदास बाबरे व सुमित्रा शंकर सोनार या एल.एल.बी द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यामध्ये श्रीकृष्ण बाबरे यांनी पहिल्या १००० उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत बाजी मारली,तर सुमित्रा सोनार यांनी १००१ ते २००० यादीमध्ये बाजी मारली. या विद्यार्थ्यांना आएएस अकॅडमीची माहिती व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. संजय आंबेकर स्पर्धा परीक्षा समन्वयक यांनी केले, तसेच विद्यार्थ्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.जी.शिंदे यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.