जळकोट, दि.५ : मेघराज किलजे: 

क्रांती साहित्यविचार मंचचे पहिले पावसाळी कवी संमेलन ऑनलाइन पार पडले. महाराष्ट्रातील नामवंत 
कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना ओलेचिंब केले.

महाराष्ट्रातील पहिले पावसाळी कविसंमेलन होण्याचे हा पहिलाच प्रयोग आहे. क्रांती साहित्य विचार मंचने नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पावसाळी कवी संमेलन आयोजित केले होते. हे कवी संमेलन ऑनलाईन पार पडले. 


या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक आनंद घोडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण पाटील हे उपस्थित होते. कविसंमेलनाची सुरुवात सरस्वती  प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. या कवी संमेलनाच्यावतीने कोरोना काळात मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत गीता मदारे गीता   गायन करून केले. 

पहिल्या पावसाळी संमेलनात विलास नवसागरे, अनिल नाटेकर, कवयित्री माधुरी चौधरी( औरंगाबाद), प्रतीमा काळे(पुणे), दीपमाला खडके( उस्मानाबाद), उमा लुकडे(पुणे), निशा कापडे, गीता मदारे, सुलभा भोसले, शरयू पामटॊराव, मयुरी जायप्पा( लातूर), ज्योती महाजन, सुरेखा वाडकर, भावना गांधीले, रूपाली शिंपी, चंदन तरवडे, सुनिता कपाले, राजश्री मराठे, बबीता महानोर व सुरजन अंगुले व बालाजी पालमपल्ले यांनी कविता सादर करून रसिकांना ओलीचिंब केले. 


या कवी संमेलनाचे आयोजन चौफेर कवी व क्रांती साहित्य विचार मंचचे समूह प्रशासक सुरज अंगुले यांनी केले होते. संमेलनाचे सूत्रसंचालन षटकोटी साहित्यप्रेमी समूह प्रशासक संध्याराणी कोल्हे यांनी तर आभार अर्चना गुर्वे यांनी मानले. महाराष्ट्रातील कवींनी यात सहभाग नोंदवून संमेलन यशस्वी केले. शेवटी पसायदानाने संमेलनाचा समारोप करण्यात आला.

 
Top