तुळजापूर दि . ६ :
श्री . तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविक भक्तांना खुले करण्याची मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणेसह इतर १८२ पूजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांचे पालन करीत भाविक भक्तांना दर्शन देण्यात यावे , तुळजाभवानी देवीचे धार्मिक विधी आणि भक्तांचा कुलधर्म, कुलाचार करण्याची खूप मोठी परंपरा आहे. ती परंपरा लक्षात घेऊन तातडीने मंदिर खुले करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
तुळजाभवानी देवीचे मंदिर १७ मार्च २०२० पासून बंद असून देवीच्या सर्व पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात मांडली आहे.
निवेदनावर माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ओमकार हंगरगेकर, इंद्रजीत साळुंके, शामराव भांजी, युवराज शिंदे, किरण अणदूरकर, गोरक्षनाथ पवार, नितीन रोचकरी, कुमार टोले, लखन शिंदे, नागनाथ इंगळे, स्वप्नील शिंदे, विकास शिंदे, रमेश यमगर, किशोर मगर, अमीत छत्रे, प्रवीण जटाळ यांच्यासह इतर १८२ पुजारी बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.
मंदिर संस्थानचे विश्वस्त , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना मागणीचे निवेदन पुजाऱ्यांनी दिले. आपण या संदर्भात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला आमदार पाटील यांनी दिले.