तुळजापूर पंचायत समिती बैठक जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न
तुळजापूर , दि . २७ :
तुळजापूर पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर तालुक्यातील पंचायत समितीचे सर्व अधिकारी व पदाधिकारी आणि सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ व शिवसेना तालुका पदाधिकारी यांची बैठक पंचायत समिती सभागृह येथे पार पडली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उपस्थितीमुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी तालुक्यातील विकास प्रश्नाबाबत जोरदार पाठपुरावा केला.
सदर बैठकीस पाणीपुरवठा, जलसंधारण, बांधकाम ,आरोग्यविभाग, शिक्षण विभाग. कृषी विभाग व शेत रस्ते व गाय, गोठा प्रस्ताव सादर करून तात्काळ मान्यता द्यावी असे जि प उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आदेश दिले.
तसेच जनतेसाठी विविध योजना गावपातळीवर पोचविण्याचे आदेश ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कार्यक्रमाचे आभार प्रशांत कुमार मनोर यांनी मानले .
सदरील बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख अनिल खोचरे, पंचायत समिती सभापती व उपसभापती व माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव , बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले, अमीर शेख, रोहित चव्हाण, प्रदीप मगर, उपशहर बापू नाईकवाडी, दिनेश रसाळ, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विभाग प्रमुख बालाजी पांचाळ ,अनिल भोपळे, महेंद्र सुरवसे ,अनिल छाञे,सोशल मीडिया प्रमुख सिद्धाराम कारभारी तसेच जयप्रकाश दरेकर. कृष्णा दरेकर .दादाराव पारवे सौदागर साप्ते. बालाजी डांगे .नेताजी पवार. जय मार्कंड. कृष्णाथ मोरे .ज्ञानेश्वर भोसले. शिवाजी कामे .अमोल गवळी. सचिन देशमुख .राजेंद्र महाराज .नानाजी कारभारी .कालिदास सुरवसे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नंतर पंचायत समितीच्या बैठकीसाठी शिवसेनेचे नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला या प्रसंगी तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी आपापल्या गावांमधील विकास कामाच्या अनुषंगाने बैठकीमध्ये जोरदार पाठपुरावा करताना दिसून आले.