तामलवाडी , दि . २७ :
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या सरहद्दीवर वसलेले तामलवाडी ता. तुळजापूर या ग्रामपंचायतीने "आर आर ( आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना "या योजनेत सहभाग घेतलेला असल्याने आदर्श ग्राम जिल्हा निवड समितीने परीक्षण केले.
तामलवाडी येथे ग्राम सचिवालय विविध रस्ते गटारी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी ,जिमखाना ,स्पर्धा परीक्षांचे वाचनालय तसेच पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू असलेली सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे परीक्षण समितीने भेट देऊन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी या परीक्षण समितीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत नितीन दाताळ मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर ,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा दशरथ देवकर, नवनिर्वाचित पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे गटविकास अधिकारी प्रताप सिंह मरोड ,सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, माजी पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा गायकवाड ,सरपंच सौ मंगल गवळी, उपसरपंच हमीद पठाण, ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, सुधीर पाटील ,आप्पासाहेब रणसुरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गवळी, शाहीर गायकवाड ,डॉ रविकांत गुरव, शिवाजी सावंत, यांचा सत्कार त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवनप्पा मसुते, ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोंढे , प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकारे , ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत साळुंखे ,चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव, सुहास वडणे, महादेव मसुते, महादेव माळी ,शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील, योगेश राऊत, गिरीश जाधव ,विनोद कुंभार ,बालाजी साठे, गणेश स्वामी ,दत्तू कोकरे, सुनील पाटील महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे, मनीषा गिरे, मनीषा सावंत, विठाबाई पाटील या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर क कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वाढणे तर महादेव मसुते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.