उस्मानाबाद ,दि .०२

मुरुम पोलीस ठाणे : ताई राजेंद्र कुंभार, रा. नागनाळ, ता. लोहारा यांच्या दस्तापुर शिवारात आष्टामोड जाणाऱ्या रस्त्यालगत बंद असलेले ‘ओम भोजनालय’ च्या शटरचे कुलूप दि. 26.06.2021 ते 23.07.2021 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून आतील विराट शक्ती ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एडी 1829 व स्वयंपाकीची भांडी चोरुन नेली. अशा मजकुराच्या ताई कुंभार यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

कळंब पोलीस ठाणे : नानासाहेब दामोदर मिसाळ, रा. अंदोरा, ता. कळंब यांनी अंदोरा गट क्र. 182 मधील आपल्या शेतात ठेवलेले कुपनलीकेचे 12 लोखंडी पाईप दि. 29- 30 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नानासाहेब मिसाळ यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top