लोहारा , दि .२३

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय  लोहारा येथे आज 23 ऑगस्ट 2021रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचा  63 वा विद्यापीठ वर्धापन दिन  कोव्हीड 19 चे व   महाराष्ट्र शासनाचे सर्व  नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.  


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांच्या हस्ते डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार   अर्पण करून व श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठ ध्वजाचे पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ अर्पण करून  विद्यापीठ गीत गायनाने ध्वजारोहण करण्यात आले. 


याप्रसंगी  राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. विनोद आचार्य , व  प्रा.डॉ. पी. के गायकवाड, प्रा.डॉ. एस.एस. कदम, प्रा.डॉ.एम. एल. सोमवंशी, प्रा. ङी. एन. कोटरंगे , प्रा. आर. एस. धप्पाधुळे, प्रा.डॉ. आर. एम. सुर्यवंशी, प्रा.डॉ. सी .जी.कडेकर, प्रा.बी. बी. मोटे, प्रा. नितीन अष्टेकर, प्रा.डॉ. बी. एस. राजोळे, प्रा.डॉ. पी. व्ही. माने , प्रा. एस. एन. बिराजदार, प्रा. डी.व्ही. बंगले, श्री. मनोज पाटील,श्री बालाजी सगर, डॉ. शिरीष देशमुख, श्री नंदकिशोर माने, श्री प्रविण पाटील, श्री परमेश्रर कदम,  श्री संजय फुगटे व विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते.
 
Top