काटी , दि .२३

  तामलवाडी  ता . तुळजापूर येथे गायकवाड कुटुंबियांच्या वतीने सामुहिक रक्षाबंधन साजरा करण्यात आला.तामलवाडी येथील कै. श्रीरंग गायकवाड, किसन गायकवाड, भानुदास गायकवाड,कै.बाळासाहेब गायकवाड, बलभीम गायकवाड, कै.निवृती गायकवाड यांच्या मुलांनी दि. 22 रोजी सामुहिक रक्षाबंधन साजरा करुन अतुट नाती जपण्याचा संदेश दिला. 

सध्या मोबाईलच्या युगात मोबाईलवर संदेश देऊन जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे. समोर भेटुन चार गोष्टी बोलण्यासाठी वेळ नसल्याने नाती ही मोबाईलवर बोलण्याईतकीच शिल्लक राहील्याचे दिसून येत आहे.परंतु एकमेकांना भेटुन जो आनंद, नात्यामधील गोडवा नातेवाईकांना, कुटुंबाला मिळतो तो कशातच मिळत नसल्याचे गायकवाड कुटुंबियांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दाखवुन दिले आहे.

कुटंबातील प्रत्येकांनी आपल्या बहीणीकडुन हातावर राखी बांधुन घेतली व सदैव बहीणीची रक्षा करण्याचे वचन दिले.  यावेळी भाऊरायानी बहीणींना ओवाळणी म्हणून साड्या दिल्या आहेत.शेवटी सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा आनंद घेतला.रक्षाबंधनच नाही तर प्रत्येक सण हा असा संपूर्ण कुटुंबासमवेत साजरा करून अतुट नाती जपावीत असे राजकुमार गायकवाड यांनी सांगितले.
    

यावेळी राजकुमार गायकवाड, कृष्णा गायकवाड,किरण गायकवाड ,ज्ञानेश्वर गायकवाड, तुकाराम गायकवाड, सुधीर गायकवाड, प्रशांत गायकवाड, समाधान गायकवाड, एकनाथ गायकवाड, शशीकांत गायकवाड तसेच त्यांच्या पत्नी बहीणी,व इतर नातेवाईक उपस्थित होते
 
Top