नळदुर्ग , दि . ९ :
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा प्रशासनाला इशारा
येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू व्हावे , यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत, यासाठी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे यापूर्वी पत्रव्यवहार केला होता, हे रुग्णालय सुरू होण्यासाठी वेळोवेळी (तीनदा) आंदोलने करण्यात आले ,परंतु अद्याप पर्यंत रुग्णालयाच्या बाबतीत हालचाली सुरू झाल्या नाहीत, रुग्णालय सुरू होण्यासाठी व काम पूर्ण होण्यासाठी साडे अकरा कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेला प्राधान्य दिले पाहिजे.
नळदुर्ग शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर असून या महामार्गावर वारंवार अपघात होतात,वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक अपघातग्रस्त दगावले आहेत, त्याच शहराशी निगडित ६० गावे दैनंदिन व्यवहारासाठी नळदुर्ग येथे दाखल होतात, हे रुग्णालय सुरू झाल्यास नळदुर्ग शहर व परिसरातील ६० गावातील जवळपास दीड लाख लोकांना आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे,असे असताना ही स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिक आरोग्य सुविधेपासून आजही वंचीत आहेत. यामुळे हे रुग्णालय सुरू होण्यासाठी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून रुग्णालय सुरू करावे व प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेंगाळलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती समोर दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०वाजता "एक दिवसीय लाक्षणिक उपोषण" करण्याचा इशारा मनसेने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके यांच्या स्वाक्षरी आहेत.