अचलेर ,दि . ९ :  जय गायकवाड 

 लोहारा तालुक्यातील अचलेर  येथील  विद्या विकास हायस्कुल  क्रिकेट स्टेडियमच्या  नव्या स्पीचचे उदघाटन अचलेर नगरीचे सरपंच प्रकाश लोखंडे याच्या हास्ते व सर्व क्रीडाप्रेमीच्या उपस्थितीत  करण्यात आले.


यंग चॅलेंजर क्रिकेट क्लब अचलेर , व  शिवनेरी क्रिकेट क्लब अचलेर  तसेच सर्व क्रीडाप्रेमी यांच्या सहकार्यातून या नव्या स्पीचचे सिमेंट ने मजबुतीकरण करून सुंदर अशा प्रकारचे मैदान तयार करण्यात आले .तसेच या ठिकाणी असलेले सर्व परिसर व सभोवताली असलेल्या कंपाऊंडची  दुरुस्ती करण्यात आली. अचलेर  व परिसरातील सर्व खेळाडूंना उत्कृष्ट असे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे .

आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधुन,आपल्या ग्रामपंचायतच्या सहकार्यातून  सर्व आजी माजी क्रिकेटपटूंच्या सहकार्यातून क्रिकेट खेळाडूसाठी सिमेंट खेळपट्टी तयार करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच   दिलीपराव माळगे,ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ कुंभार , ग्रामपंचायत  सदस्य  अनंत घोडके ,  विद्या विकास हायस्कुलचे सहशिक्षक तथा उत्कृष्ट क्रिकेटर  फारूक जमादार  ,यंग चॅलेंजर क्रिकेट संघ अचलेरचे कर्णधार तथा  संघाचे उत्कृष्ट खेळाडू व मार्गदर्शक  गुरूसिंग दादा बायस ,  युवा नेते  सुधीर  बंडगर ,  महादेव  सुभेदार , राजू  सोलंकर  ,  संदीप राठोड  ,  दत्ता यमगर , सागर गहीलोत  ,महेश  बायस ,  सागर  कमलापुरे , दयानंद माळगे ,   बायस , इरण्णा हडलगे आदीसह   ग्रामस्थ , सर्व क्रिडाप्रेमी व मित्र मंडळ यावेळी उपस्थित होते.
 
Top