कोतवालांच्या राज्यव्यापी संपास अक्कलकोट संघटनेचा पाठींबा
अक्कलकोट कोतवाल संघटनेकडून तहसीलदाराना निवेदन सादर
अक्कलकोट दि. ९ :
राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्ट पासून, राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार असल्याने, त्याचाच एक भाग म्हणून, आज अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्यव्यापी संपाला अक्कलकोट तालुक्याचा पूर्ण पाठींबा असल्याचे तालुका अध्यक्ष शफील वाडीकर यांनी यावेळी सांगितले.
कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावे, चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील कोतवालाना सरसकट १५,०००/- वेतन देण्यात यावा. कोतवाल संवर्गातील दि.०६/०२/२०१९ रोजी शासन निर्णयाबाबत पत्र क्र. ११२ ई १० मार्गदर्शन पत्र रद्द करण्यात यावा.कोतवलांना तलाठी व तत्सम पदामध्ये ५०% आरक्षण देण्यात यावा. शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून १००% पदोन्नती भरणेबाबत. कोरोना सारख्या महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या वारसांना नियुक्ती करण्यात यावा. सेवानिवृत्ती नंतर कोतवालास कुठल्याही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्ती कोतवालास १० लक्ष रु एकरकमी निर्वास भत्ता देण्यात यावा.
अशा वरील विविध मागण्या संदर्भात राज्यव्यापी संप पुकारला जाणार असून, त्या संपास अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेचा जाहीर पाठिंबा असून, त्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, तालुका उपाध्यक्ष रेवनसिद्ध सुतार, सरचटणीस शिवानंद कोळी, दीपक कांबळे, प्रवीण गुंजले, प्रविणकुमार बाबर, सुनील मुलगे, काशीनाथ माने, रजाक जमादार, हसन मुजावर, सोमनाथ आलूरे, बसवराज गायकवाड, सुचिता काळे, संगमनाथ कुंभार, सूर्यकांत रामपुरे, नजीर शेखजी, अवधूत पुजारी, शिवशरण कोळी, हनुमंत सानप, यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.