मुरुम, दि. १६ :
येथील विठ्ठलसाई साखर कारखान्यातील बाबाराव कदारे यांचा कोरोना मुळे दि. १४ मे रोजी निधन झाले. त्यांच्या कुटूंबियांना कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी आर्थिक मदत देण्याचे घोषित केले होते. मदतीचा धनादेश जि.प.विरोधीपक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते सोमवारी देण्यात आला.
कारखान्याच्यावतीने पत्नी शिलादेवी बाबाराव कदारे यांना अचलेर ता.लोहारा येथे त्यांच्या घरी नेवून १९ लाख ७ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून के. कदारे यांच्या पत्नीला दरमहा रु. २६४६ फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा रु. ६६२.०० प्रमाणे पेन्शन मंजूर करून घेण्यात आले आहे.
यावेळी दत्ता पाटील संचालक डी. सी. सी. बँक उस्मानाबाद, सरपंच प्रकाश लोखंडे, सुभाष सोलंकर माजी सरपंच, परमेश्वर पटणे, शिवराज कमलापुरे, शिवपुत्र पाटील, सिध्दाराम पत्रिके, महादेव कदारे,आप्पासाहेब कदारे, अचितानंद कुंभार, कल्लाप्पा गोपणे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी. मुख्य लेखाधिकारी शत्रुघ्न देशमुख, सहायक लेखाधिकारी राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.