नळदुर्ग, दि. १६ :
75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान वाणिज्य महाविदयालयात कोरोना आपत्तीमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकार, पोलीस, आरोग्य, स्वच्छता आदी क्षेत्रातील मान्यवरांचा "कोरोना योध्दा" पुरस्काराने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते. तर यावेळी व्यासपीठावर संचालक तथा सरपंच रामचंद्र आलुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, नेताजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, वैदयकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. अक्षय जानकर, नगरसेवक विनायक अहंकारी, मुख्याध्यापिका सौ. महादेवी जवळगे-जत्ते, कविता उकरंडे-पुदाले, आरोग्य सहाय्यक अधिकारी धोंडिराम कदम, औषध निर्माण अधिकारी गणेश बडुरे, नगरपालिकेचे मुनीर शेख, पत्रकार सुहास येडगे, तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद काळुंके, आरोग्यसेविका सुमन फुले, मनिषा राजपुत, आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमिक पोतदार, सफाई कामगार मिना बनसोडे, लक्ष्मी देडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कोरोना योध्दा पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाचा विद्यार्थी विक्रम राठोड आदींचा पुष्पगुच्छ, शाल, प्रशस्तीपत्र देवून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात खो-खो खेळामध्ये पदक मिळविणा-या लखन पंडीत चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी निलेश शेटे, डॉ. महेंद्र भालेराव आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार तर आभार डॉ. निलेश शेरे यांनी मानले.
यावेळी पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, डॉ. दिपक जगदाळे, पांडुरंग पोळे, सचिन गायकवाड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश गायकवाड, एन सी सी विभाग प्रमुख आतिश तिडके , भानुप्रकाश पुदाले, अतुल बनसोडे, माणिक राठोड , भागिनाथ पाञे , दिनेश पुदाले , महादेव जाधव , सिद्राम सुतार , बारीकराव शिंदे , सर्जे , बेले , अरुण नाईक आदीनी परिश्रम घेतले .