जळकोट, दि . १६ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जळकोट ग्रामपंचायतच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला . महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच सौ. श्रीदेवी कवठे, ग्रामपंचायत सदस्या सौ. राजश्री कागे, उज्वला भोगे, सुरेखा माळगे, दीपा कदम यांच्या हस्ते करण्यात येऊन ध्वजारोहण सरपंच अशोकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सैनिक टीमने ध्वजारोहणावेळी सलामी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर व जिल्हा परिषद प्रशाला अशा तीनही शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
ध्वजारोहण करून सलामीसह सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगरच्या मुलींनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी हार्मोनियमवर सहशिक्षक दयानंद सोनवणे यांनी साज चढवला. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या मुलींनी संगीताच्या तालावर नृत्यासह देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सदरच्या गाण्याने उपस्थितांमध्ये वीरश्रीची भावना निर्माण झाली होती. सदर नृत्यगीत कु. अमुल्या संजय सगर, कु. अस्मिता अमोल ठोंबरे, कु. मीरा धोंडीबा कागे, कु. प्रांजल प्रशांत सगर, कु. नेहा दिनकर कोरे, कु. समृद्धी शिवाजी चुंगे व कु. तनुजा लक्ष्मण चव्हाण आदींनी सहभाग नोंदवला.
या मंगलमय दिवसाचे औचित्य साधून नुकताच इयत्ता दहावी व बारावी मधून विशेष गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता १० वी मधील कु. स्नेहा सुनिल माने, समिना रफिक मुल्ला, प्रफुल्ल बऱ्हाणपुरे, कु. पलक प्रदिप मंटगे, राजलक्ष्मी मेघराज किलजे, सुप्रिया विरभद्र धरणे यांचा तर इयत्ता १२ वी मधील प्रथमेश सुरवसे, सोहम कलाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील एम.बी.बी.एस. झालेली प्रथम मुलगी कु. अंकिता भाऊ मोर्डे हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड हे दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता १ ली मधील विद्यार्थी चि. योगेश कदम, इयत्ता ३ री मधील चि. यश सतीश कदम या दोघांनी भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
भरगच्च झालेल्या कार्यक्रमास जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, प्रशांत नवगिरे, जीवन कुंभार, अंकुश लोखंडे, कल्याणी साखरे, ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे, तलाठी तात्यासाहेब रुपनवर, ज्येष्ठ माजी सैनिक कोंडाप्पा कुंभार, ज्ञानदेव सगर, अरुण माने, राम किलजे, शंकर कांबळे, महादेव सावंत, सावंत ,यशवंत कदम, अंकुश लोखंडे तर माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे सोसायटीचे चेअरमन आनंदराव पाटील, ग्रामस्थ दत्तात्रय चुंगे, बालाजी सुरवसे, वसंत सावंत, श्रीशैल दरेकर,कृष्णात मोरे, बळीराम गंगणे, प्रदीप अंगुले, बालाजी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी नागू स्वामी, लहू कार्ले, अतुल कदम, अर्जुन सावंत, मल्लू डांगे, विलास फुकटे, विशाल जाधव, अनिल पासोडे, बाबू राठोड आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार मेघराज किलजे यांनी केले.