काटी , दि .१६ :
भारतमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील माजी सैनिकांच्या वतीने येथील बसस्थानक शेजारील माजी सैनिक कल्याणकारी संस्था कार्यालयात रविवार दि. 15 रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी माजी सैनिक सुभेदार मेजर जगन्नाथ खपाले व सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यंदा येथील माजी सैनिक श्रीकांत गाटे यांनी स्वखर्चाने कार्यालयाची दुरुस्ती करून कार्यालयास देशाचे प्रतिक असणाऱ्या तिरंगा रंगाने कार्यालयाची सुरेख रंगरंगोटी करुन कार्यालयासमोर रांगोळीची सजावट करण्यात आली होती.
यावेळी माजी सैनिक सुभेदार मेजर जगन्नाथ खपाले, सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, व्हाइस चेअरमन भागवत गुंड, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सरपंच आदेश कोळी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी सैनिक श्रीकांत गाटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, अनिल गुंड, हेरार काझी,संजय महापुरे, बाळासाहेब भाले,माजी सैनिक संतोष थिटे, इजदानी बेग,भिमा बनसोडे, विठ्ठल क्षिरसागर, जयसिंग आगलावे, भारतीय सैनिक किरण क्षिरसागर, महेश गाटे, दादा गाटे, वैभव गुंड, अतुल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.