मुरूम, दि. १५ :
येथील नगर परिषदेमार्फत शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसह विविध योजनेतील नागरिकांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वाटप स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून (ता. १५) रोजी करण्यात आले.
प्रारंभी नगराध्यक्षा अनिता अंबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन भत्ता, अंगणवाडी सेविकांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचे मानधन, दीनदयाळ आंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एएलएफ) वस्ती स्तर संघांना प्रमाणपत्र वाटप तसेच शहरातील पात्र बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये व्यवसाय करण्यासाठी कर्ज वाटप नगराध्यक्षा अनिता अंबर, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुशील कांबळे तर आभार कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे यांनी मानले.