नळदुर्ग , दि . ३०
बसवंतवाडी ता. तुळजापूर येथिल शिवारात खरिपातील साडे चार एकर क्षेत्रावरील उडिद पिकावर शेतक-यानी रोटरव्हेटर फिरविल्याची घटना घडली आहे.
तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारात नागेश बाबुराव बनसोडे यांचे एक एकर क्षेत्र , बिरु बाबुराव बनसोडे यांचे दिड एकर , तर सागर अण्णा माने यांचे दोन एकर क्षेत्र असे मिळुन साडेचार एकर क्षेत्रावरील शेतातील उभ्या उडिद पिकावर ट्रॕक्टरने रोटाव्हेटर फिरविले आहे. हि घटना शुक्रवार दि . २० आँगस्ट रोजी घडली आहे.
याप्रकरणी सरपंच नागेश बनसोडे यानी सांगितले , बसवंतवाडी येथिल वरील शेतक-यानी आपल्या शेतात खरीप हंगामात निर्मल कंपनीचे उडीद बियाणे आणुन पेरणी केली. पिक जोमात आले. माञ त्यास फळधारणा झाले नाही. म्हणुन उभ्या पिकावर ट्रॕक्टर फिरविला आहे. याप्रकरणी तक्रार करुन काही उपयोग होत नाही , म्हणुन शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार केली नसल्याचे बोलताना बनसोडे यानी सांगितले .
दरम्यान शेती पिकली तर शेतमालाला भाव नाही , तर दर्जाहीन बियाणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका नाहकच सहन करावा लागत असुन याबाबत पंचनामा करुन शेतक-याना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यातुन होत आहे.