जळकोट,दि.३ : 

 कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा कुलूपबंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा व शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाची दखल घेण्यासाठी व शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्य व प्रत्येक विभागीय पातळीवर ' माझी शाळा- माझा उपक्रम ' हि  स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.


महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी विरुद्ध लढा देत आहे. या महामारीमुळे राज्यातील सर्व खाजगी व शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. परंतू  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा विविध उपक्रम राबवत आहेत. यात वैयक्तिक शिक्षकही विविध उपक्रम घेत आहेत. या उपक्रमांची दखल घेण्यासाठी राज्य स्तरावर व सर्व विभागीय स्तरावर महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ' माझी शाळा- माझा उपक्रम ' हि अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे.


ही स्पर्धा राज्य स्तरावर घेण्यात येत असून, राज्यातील खाजगी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी खुली राहणार आहे. वैयक्तिक शिक्षक यांनाही यात भाग घेता येणार आहे. ही स्पर्धा सामूहिक शाळा उपक्रम व वैयक्तिक शिक्षक उपक्रम अशा विभागात घेतली जाणार आहे. सामूहिक शाळा गटात प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट असणार आहेत. यात शाळेच्या सर्व शिक्षकांनी मिळून घेतलेल्या उपक्रमावर आधारित आहे. राज्यस्तरावर  व प्रत्येक विभागीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय व वैयक्तिक शिक्षक गटात प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट असणार आहेत. यात वैयक्तिक शिक्षकांनी घेतलेल्या उपक्रमावर आधारित आहे. यात राज्यस्तरावर व प्रत्येक विभागीय पातळीवर प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येणार असून, राज्यातील सर्व शाळा व सर्व शिक्षक यांच्यासाठी  प्रवेशिका खुली राहणार आहे. विजेत्या प्रथम , द्वितीय व तृतीय राज्यस्तरावरील शाळांना व प्रत्येक विभागीय स्तरावरील प्रथम द्वितीय व तृतीय शाळांना तर वैयक्तिक प्राथमिक व माध्यमिक पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षकांना राज्यस्तरीय व प्रत्येक विभागीय स्तरीय प्रथम ,द्वितीय व तृतीय विजेत्यांना एका खास समारंभात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शाळा उपक्रमाची व वैयक्तिक शिक्षक उपक्रमाची माहिती एकत्रित करून ' माझी शाळा- माझा उपक्रम ' हा ग्रंथ प्रकाशित करून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे.

 प्राथमिक व माध्यमिक शाळांनी व वैयक्तिक शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमाची सविस्तर  माहिती दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत ५००रुपये प्रवेश शुल्कासह ८०८७२५१२२२ या व्हाट्सअप नंबर वरती पाठवावे. एका प्रवेशिकांसाठी एकच उपक्रम ग्राह्य धरला जाईल. तरी राज्यातील जास्तीत जास्त शाळांनी व शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष दीपक आगळे- पाटील व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे उपाध्यक्ष मेघराज किलजे यांनी केले आहे.
 
Top