तामलवाडी ,दि. ३१ : 

 तामलवाडी ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 18 वर्षावरील 300 व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड  लसीकरण  करण्यात आले . यावेळी राणा प्रतिष्ठानकडुन लाभार्थ्यांना भेट वस्तू  देण्यात आले. 


या कार्यक्रमाचे उदघाटन  प्रसंगी  आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमा  लोंढे, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय  शिंदे, राणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  यशवंत  लोंढे , ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मंगल गवळी , माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, माजी उपसरपंच  दत्तात्रय  वडणे ,  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या आदेशानुसार व पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले व बनसोडे मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होता. 


या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, सुधीर पाटील ,आप्पासाहेब रणसुरे, , सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गवळी, शहाजी लोंढे, शाहीर गायकवाड ,शिवाजी सावंत, ज्ञानेश्वर पाटील, बापूसाहेब पाटील, सुधीर गायकवाड, पांडुरंग पटाडे ,दत्तात्रय जगताप , रामलिंग सगर, इमरान बेगडे ,स्नेहल राऊत आदी उपस्थित होते. 


यावेळी लसीकरण पूर्ण करण्यासाठी डॉ. शुभांगी जळकोटे ,डॉ. स्वाती बारस्कर ,आरोग्य सेविका संगीता चव्हाण, आदलिंगे साळवे यांनी परिश्रम घेतले. राणा प्रतिष्ठानचे सदस्य सोमनाथ सरडे ,ओम चव्हाण ,विनायक पवार, राघवेंद्र चाबुकस्वार ,सुरज जाधव, मनोज जाधव, आकाश लोखंडे ,योगेश घोडके, आकाश ठोंबरे ,हरी लोंढे ,यांनी उपस्थित राहून लसीकरण यशस्वी करण्यासाठी पुढाकार  घेतले .
 
Top