मुरूम, दि. ०१
पत्रकार दिवंगत शफी इमडे यांचा बुधवारी (ता.१) रोजी प्रथम स्मृती दिन महाराष्ट्र पत्रकार संघ, उस्मानाबाद व मुरुम शहर पत्रकार संघाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात आभिवादन करण्यात आले.
प्रारंभी दिवंगत शफी इमडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश निंबरगे, राजेंद्र कारभारी, विलास वाडीकर, रफिक पटेल, राजेंद्र घोडके, रामलिंग पुराणे, बालाजी व्हनाजे, डॉ. महेश मोटे, नहीरपाशा मासुलदार, अजिंक्य कांबळे, प्रा. प्रविण राठोड, संतोष कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, कंटेकूरचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. नागनाथ बनसोडे, गोपाळ हिंगोले, शिवपुत्र सोलापूरे, सुधीर गायकवाड आदींच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.