उस्मानाबाद , दि . ०१


टोमॅटोचे दर कमी झाल्याने महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयाचे अनुदान देण्यात यावे, या मागणीचे 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

 या निवेदनात म्हटले आहे की
 सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या मार्केट मध्ये चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या २५ ते ३० किलीच्या कैरटला ८० ते १०० रु चा भाव मिळत आहे. म्हणजेच २ ते ३ किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च हा लाख रुपयांच्या जवळपास असल्याने उत्पादन खर्च तर सध्याच्या भावात वाहतूक व तोडणीचा खर्चही निघत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळेच बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत अथवा गुराढोराना खायला टाकत आहेत.

अशावेळी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शैलकल्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उसे टाकले पाहिजे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत शासनाने देऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे. तसेच पणन मंडळाच्या माध्यमातून सरकारने प्रति किलो 10 रुपये दर निश्चित करून नागणी असलेल्या राज्याबाहेरील बाजार समित्यांमध्ये टोमॅटो  पाठवावे, जेणेकरून दरामध्ये सुधारणा होईल. राज्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर   मोठे संकट आलेले असताना राज्य सरकार काहीच मदत  करत नाही. अथवा या प्रश्नावर बोलताना दिसत नाही. 
याप्रकरणी  गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने त्वरित टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणी टोमॅटो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्याचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, प्रदेश उपाध्यक्ष  बाळासाहेब कोठावळे, जिल्हा अध्यक्ष आबसाहेब ढवळे, जिल्हा सचिव दादा कांबळे , शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष राहुल बचाटे , जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे , उपतालुका अध्यक्ष सलिम औटी आदीच्या सह्या आहेत.

 
Top