वागदरी , दि . २२ : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील बोरी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम पंधरा दिवसांत सुरु न केल्यास रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या वतीने नदीपात्रात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना रिपाइंच्या वतीने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,येडोळा ता . तुळजापूर येथील बोरी नदीवर येडोळा गाव ते येडोळा पाटी (कंदुरमळा)जोडणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम पंधरा दिवसात सुरू न केल्यास रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया जिल्हा शाखेच्या वतीने येडोळा येथे नदीच्या पात्रात के.टी.बंधाऱ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांना रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे, तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,तालुका नुतन उपाध्यक्ष रामचंद्र लोंढे, तालुका संघटक सुरेश लोंढे, येडोळा शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, भाजपचे नवनाथ जाधव आदीसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.