नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या नियमबाह्य गुंठेवारीची चौकशी करून याप्रकरणी कार्यवाही होईपर्यंत मुख्याधिकारी यांची बदली थांबवावी या मागणीसाठी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने दि.२२ सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.


 नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी पालिका हद्दीत बेकायदेशीर व नियमबाह्य गुंठेवारी नियमधीन केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील कांही खासगी जमीन मालकांच्या जमिनीचे बेकायदेशीर गुंठेवारीची नियमबाह्य नोंदी केल्या आहेत. त्याचबरोबर या गुंठेवारीच्या नोंदी घेत असताना जमीन एका बाजुला आणि गुंठेवारीची नोंद केलेली जमीन एका बाजुला आहे. हा प्रकार जमीन मालकांनी मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे. या गुंठेवारी प्रकरणात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.त्याचबरोबर गुंठेवारी नियमधीन करण्यासाठी तयार करण्यात आलेले बहुतांश प्रस्तावामध्ये अनेक गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे या गुंठेवारी प्रकरणाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होईपर्यंत मुख्याधिकारी यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक, तानाजी जाधव व विलास येडगे यांनी नगरपालिका कार्यालयासमोर बुधवार रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. 



या उपोषणाला नगरसेवक बसवराज धरणे, उदय जगदाळे, विनायक अहंकारी, माजी नगरसेवक संजय बताले,सचिन डुकरे,  सुधीर हजारे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी , लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर, भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर,  बंडप्पा कसेकर, खय्युम कुरेशी, गुरुनाथ कलशेट्टी, कल्याणी कलशेट्टी, पञकार भगवंत सुरवसे, आय्युब शेख ,  इरफान काझी , यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. 


तर युवासेनेचे ज्ञानेश्वर घोडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठींबा दिल्याचे पत्र दिले.त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा  वाॕरीयर्सचे शहर अध्यक्ष मुदस्सर शेख यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. या उपोषणाला शिवशाही तरुण मंडळासह नळदुर्ग   शहरांतुन उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला.
 
Top