तुळजापूर , दि . २२
तुळजापूर शहरातील सुवर्ण व्यापारी जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके यांनी विजय भोसले यांची भ्रष्टाचार समितीच्या उस्मानाबाद जिल्ह्यअध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
विजय भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उदूगुडे व शांताराम खुडे यांनी विजय भोसले यांना उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी दिली .
तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी सत्कार केला आहे, यावेळी कदमवाडीचे प्रगशील शेतकरी नागनाथ कोल्हे, शिवसेना युवा सेनाचे जिल्हा चिटणीस लखन परमेश्वर, स्वप्नील पाठक आदीजन उपस्थित होते.