नळदुर्ग , दि . २२
मैलारपूर (नळदुर्ग ) येथिल जुन्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून गेल्या दोन महिन्यात या मंदिरात सुरू असलेल्या बांधकामामुळे येथील मंदिराचे रुपडे पालटले आहे.
मंगळवारी महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण समितीचे सदस्य उमाकांत मिटकर यांची कन्या सिद्धी मिटकर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नी प्रणिता मिटकर, मुलगी सिद्धी, मुलगा शौर्य मिटकर यांच्यासमवेत उमाकांत मिटकर यांनी नळदुर्ग येथील जुन्या ऐतिहासिक खंडोबा मंदिरात येऊन खंडोबाचे दर्शन घेतले तसेच येथील सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामाची पाहणी केली . यावेळी त्यांनी मंदिराला गतवैभव प्राप्त झाले असल्याचे सांगत जीर्णोद्धार कार्याचे कौतुक केले.
आपली कन्या सिद्धीचे वाढदिवस
असल्याने वढदिवसावरील होणारा खर्च टाळून मंदिर कामाला योगदान दिले विशेष म्हणजे हा निधी सिद्धीने वर्षभरात आपल्या घरी आलेले पाहुणे, आई-वडील, नातेवाईक यांनी आपल्याला खाऊ साठी दिलेले पैसे आपल्या खाण्यापिण्यावर किंवा खेळणी खरेदीवर खर्च न करता ते सर्व पैसे आपल्या पिगीबँक मध्ये जमा केलेले आहेत त्यामुळे सिद्धीचे खंडोबा मंदिर जीर्णोद्धारासाठी दिलेले योगदान इतरांना प्रोत्साहन देणारे आहे. सिद्धी उमाकांत मिटकर हिने आपल्या जवळ असलेला गल्ला सुपूर्द केला त्यात एकूण 10602 रुपये जमा झाले होते तो संपूर्ण निधी मंदिर जीर्णोद्धारासाठी दिला. सिद्धीने आपल्या खाऊचे पैसे वाढदिवसानिमित्त देणे ही बाब इतरांसाठी खूप प्रेरणादायी व तितकीच भावनिक देखील आहे. यावेळी पत्रकार विलास येडगे, श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, पुजारी अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.