नळदुर्ग , दि .२२ ,सुहास येडगे 

नळदुर्ग शहरातील  सर्व बेकायदेशीर गुंठेवारीची नोंदी आठ दिवसात रद्द  करुन तात्काळ दोषीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आज  बुधवार   दि.२२ सप्टेबर  रोजी नगरपालिका कार्यालया समोर पञकार  संघाचे उपोषण सुरु करण्यात आले आहे.


नळदुर्ग येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील नियमबाहय गुंठेवारी केल्याप्रकरणी चौकशी करुन याप्रकरणी कारवाई होईपर्यंत त्यांची बदली थांबविण्याची मागणी   नळदुर्ग  शहर पत्रकार संघाच्यावतीने निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी  यांच्याकडे करण्यात आली आहे.


 नळदुर्ग नगपालिकेचे मुख्याधिकारी  रुजु झाल्यापासुन  ते आजपर्यंत पालिका हददीत बेकायदेशीर व नियमबाहय गुंठेवारी नियमाधीन केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र हेच नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी हे नागरीकांना मुलभुत सोयी सुविधा पूरविण्यास कुचराई करताना दिसत आहेत. परंतु ज्या ठिकाणी मुख्याधिकारी यांचे अर्थिक  हित साध्य होत आहे,  अशा ठिकाणी ते तत्परतेने कर्तव्य बजावतना दिसत आहेत.

 मुख्याधिकारी म्हणून नगरपालिकेचा पदभार घेतल्यानंतर विद्यमान मुख्याधिका-यांनी पालिकेत अनेक नियमबाह्य कामे केली आहेत, त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील कांही खासगी  जमीन मालकांच्या जमीनीचे बेकायदेशीर गुंठेवारीची नियमबाहय नोंदी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर या गुंठेवारीची नोंदी घेत असताना जमीन एका बाजुला आणि गुंठेवारीची नोंद केलेली जमीन एका बाजुला आहे, असा प्रकार जमीन मालकांनी मुख्याधिकारी यांना हाताशी धरुन केला आहे, त्यामुळे यामध्ये मोठया प्रमाणात  मुख्याधिकारी यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे. 
बनावट गुंठेवारी करुन पालिकेतील दप्तराला बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्या आहेत, या नोंदीच्या आधारे जमीन मालकांनी प्लॉट घेणाऱ्या नागरीकांना आंधारात ठेवून अशा जमीन मालकांकडून बोगस गुंठेवारीच्या नोंदीच्या आधारे तुळजापूर येथील तालुका दुय्यम निंबंधक कार्यालयात जावुन या गुंठेवारीची खरेदी -  विक्रीचा व्यवहार मोठया प्रमाणात  करण्यात आला आहे. परंतु नळदुर्गमध्ये मुख्याधिकारी यांच्याशी संगनमत करुन शासनाचे  सर्व नियम  धाब्यावर बसवुन  बेकायदेशीरपणे मोठया प्रमाणात अनेकांच्या जमीनीची बनावट व नियमबाहय गुंठेवारीच्या पालिकेच्या दप्तरी नोंद केली आहे.

 दरम्यान गुंठेवारी नियमाधिन करण्याकरीता तयार करण्यात आलेले बहुतांशा प्रस्तावामध्ये गंभीर त्रुटी आसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर प्रस्ताव तयार करणारे नगपालिकेचे लिपीक व त्या प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे मुख्याधिकारी , अभियंता यांची या प्रकरणी चौकशी करुन दोषीविरूध्द कारवाई होणे आवश्यक आहे, कारण अशा बोगस आणि बेकायदेशीर व बनावट गुंठेवारीची नोंदी करण्यासाठी पालिकेत त्यांच्याकडूनच प्रस्ताव तयार करण्यात आला असून याप्रकरणी शासनाचीही फसवणूक झाली आहे.


शहरातील रहीमनगर,  त्याचबरोबर व्यासनगर परीसरातील मंडळ अधिकारी कार्यालय, इंदिरानगर, जुने गॅस गोडावुन, खंडोबा रस्ता, जलशुध्दीकरण केंद्राच्या परीसरातील जमीनीच्या नियमबाहय गुंठेवारीच्या पालिकेच्या दप्तरी नोंदी घेण्यात आल्या आहेत. यामध्ये इनामी जमीन आणि खासगी जमीनीचा समावेश आहे. 
 त्याचबरोबर ज्या ठिकाणी रेखांकण करुन प्लॉट विक्री करण्यात आले आहेत, अशा जमीनी मालकांनी पून्हा त्याच रेखांकणामधील खुल्या जागेत ( ओपन स्पेस ) ही अशा जमीन मालकांनी मुख्याधिकारी यांना हाताशी धरुन त्या ही ठिकाणी गुंठेवारी करुन नकाशा बदलुन नोंदी करुन त्या ही जागेची विक्री करण्यात आल्याचे प्रकार ही मोठया प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे  या सर्व बेकायदेशीर गुंठेवारीची नोंदी आठ दिवसात रद्द  करुन तात्काळ दोषीवर कडक कारवाई करावी अन्यथा दि.२२ सप्टेबर २०२१ बुधवार रोजी नगरपालिका कार्यालया समोर एक दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


 या निवेदनाची प्रत  नगर विकास मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, पोलिस अधिक्षक उस्मानाबाद , तहसीलदार, तुळजापूर , सहाय्यक पोलिस निरीक्षक, नळदुर्ग, मुख्याधिकारी नगरपालिका नळदुर्ग याना देण्यात आले आहे. निवेदनावर नळदुर्ग  शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास  येडगे ,  सदस्य तानाजी  जाधव,   विलास  येडगे,  शिवाजी  नाईक आदीच्या सह्या आहेत.
 
Top